HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण | संभाजीराजे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार

पुणे | मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक महत्वाच्या नेत्यांना भेटण्याची सपाटा लावलाच आहे. तसेच, महाराष्ट्रभर दौरे करत ते मराठा समाजाच्या अडचणीही जाणून घेत आहेत. याच भेटीचा सपाटा पुढे सुरु ठेवत आज (२९ मे) खासदार छत्रपती संभाजीराजे बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मराठा आरक्षण विषयी पुणे येथील आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. ४ वाजता ते प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत.

भारत देशातील सद्यस्थितीत असणारी आरक्षण प्रक्रिया राजर्षी शाहू महाराजांच्या संकल्पनेतील आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच आरक्षणाच्या संकल्पनेचा भारताच्या राज्यघटनेत सहभाग केला आहे. व आज यांचे वंशजांची मराठा आरक्षण विषयी भेट होत असल्याने भेटीला एक वेगळे महत्त्व प्राप्त होत आहे.

दरम्यान, संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.शरद पवार-संभाजीराजे भेटीमध्ये काय झालं ?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ते पुन्हा मिळवण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप खासदार संभाजीराजे हे देखील आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी काल (२७ मे) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही भेट सकारात्मक झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे नारायण राणे या सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा”, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

संभाजीराजेंनी शरद पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची घेतली भेट

मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार संभाजीराजे देखील पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, संभाजीराजे यांनी गुरुवारी (२७ मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या आहेत.

राज ठाकरेंच्या भेटींनंतर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, “राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जात-पात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत. माझ्या भूमिकेला ते समर्थन देखील करतात. माझे पणजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे जिवलग मित्र होते. छत्रपती घराण्याचं आणि ठाकरे घराण्याचं ते नातं आजही आहे. शिवाय किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन या मुद्द्यावर देखील आमचं एकमत आहे. त्यामुळे त्याबाबत देखील आमची चर्चा झाली”, असे संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणावर मार्ग काढण्याची जबाबदारी माझीच नाही तर सर्व पक्षांची !

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे आरक्षण कसे मिळवता येईल याचसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, शरद पवार यांची भेट घेतली तर दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मी माझ्या समाजासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची भेट घेत आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रात प्रमुख समाज आहे. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी माझीच नाही तर सर्व पक्षांची आहे”, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

मोदींना ४ वेळा भेटीसाठी पत्र लिहिलं

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या भेटीसाठी वारकरी आणि कोळी बांधव ‘कृष्णकुंज’वर!

News Desk

काँग्रेस सोडून जाणारे NSUI ,Youth congress अशा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीतून तयार झाले नाहीत – सत्यजित तांबे

News Desk

मुनगंटीवारांची नाराज पोलिसांना साद, दबावाखाली न येता राज्यपालांकडे तक्रार करण्याचे आव्हान

News Desk