HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत मुंबईत होणार बैठक, हार्दीक पटेल राहणार उपस्थित

औरंगाबाद | मराठा आरक्षणासंदर्भात औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मंगळवारी चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमानिमित्त पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे देखिल उपस्थित राहील्याचे पहायला मिळाले. यावेळी बोलताना विनोद पाटील म्हणाले, मराठा समाज कोणत्याही इतर समाजाचा आधिकार काढून स्वतःला आरक्षण मागत नाहीये तर स्वतंत्र व घटनात्मक चौकटीतच आरक्षणाची मागणी करीत आहे. मिळालेले आरक्षण न्यायालयात लढा देऊन टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबत अनेकांचे गैरसमज झालेले आहेत असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि विनोद पाटील यांच्यात बराच वेळ आरक्षणावर चर्चा देखील झाली. आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक पटेल औरंगाबाद शहरात उपस्थित राहीले होते. विनोद पाटील व हार्दिक पटेल यांच्या चर्चेत असे ठरले की, ज्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मराठा आरक्षणाला विरोध आहे त्या सर्व जाती-धर्माच्या नेत्यांची एक संयुक्त बैठक मुंबई येथे घेण्यात येईल. बैठकीत आरक्षणाबाबतचे गैरसमज दूर केले जातील. लवकरच मराठा समाज मिळालेले आरक्षण न्यायालयीन लढा लढवून टिकवेल असा विश्वास विनोद पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटील अलर्ट… संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाशी घेतली बैठक!

News Desk

केंद्रीय मंत्रिमंडळातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रावसाहेब दानवे यांची ताबडतोब हकालपट्टी करावी

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSCची १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलली

News Desk