HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

नाराज पंकजा मुंडेंची मनधरणी करण्यासाठी विनोद तावडेंची भेट

मुंबई | भाजपचे नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री विनोत तावडे हे नाराज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची मनधरणी करण्यासाठी गेले आहे. पंकजा मुंडे यांच्या शासकीय निवसस्थान रॉयलस्टोन येथे बैठकीला सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्ट आणि ट्विटरवरील बायोवरून पक्षावर नाराज असल्याच्या काल (२ डिसेंबर) पासून चर्चा राजकीय वर्तुळात रंगलू लागल्या आहे. या पार्श्वभूमीव आज (३ डिसेंबर) दोघांमध्ये यावर बैठक सुरू आहेत.

मात्र, आज त्यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेन्द्र प्रसाद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादनाचा भाजपचे कमळ असलेला फोटो पोस्ट केल्याने त्या भाजपतच असल्याचा संदेश दिला आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल  आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना मुंडेसंदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की,“पंकजाच काय अनेक भाजप नेते शिवसेनेच्या संपर्कात,” असल्याचा दावा त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पत्रकार परिषद बोलविली होती. यात पाटील यांनी म्हटले की, “पंकजांच्या पक्षांतराच्या बातम्या या केवळ अफवा असून त्या भाजपमध्ये होत्या, आहेत आणि राहतील,’ असे स्पष्टीकरण दिले.

Related posts

राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध, रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे | औषध प्रशासनमंत्री

News Desk

अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

News Desk

मी आरक्षणाच्या लढ्यात तुमच्यासोबत, कोल्हेंचे धनगर समाजाला आश्वासन

News Desk