HW News Marathi
महाराष्ट्र

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

जळगाव। चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला कालपासून (१३ डिसेंबर) प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे यांनी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.

दानवे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासन प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी रेल्वे विभागाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. नवीन रेल्वे सेवा, मार्ग सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करण्यात येत आहेत. महसूल राज्यमंत्री सत्तार म्हणाले, मराठवाडा आणि खानदेशला जोडणारा महत्वाकांक्षी सोलापूर- जळगाव रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. रेल्वे सेवा व अन्य मार्गांसाठी आपण राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार उन्मेश पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.चाळीसगाव येथे झालेल्या कार्यक्रमास धुळेचे महापौर प्रदीप कर्पे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, रेल्वेचे विभागीय प्रबंधक एस. एस. केडिया, सहाय्यक प्रबंधक युवराज पाटील, वरीष्ठ सुरक्षा अधिकारी गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांनी केलं नव्या CBI संचालकांचं कौतुक ! महाविकासआघाडीसोबत झाले होते मतभेद

News Desk

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये रेल्वेतून उतरवलं!

News Desk

ती भेट म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय, पडळकरांचा घणाघात

News Desk