HW News Marathi
Covid-19

ग्रंथालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा आदेश; मेट्रो देखील १५ऑक्टोबरपासून सुरु होणार  

मुंबई | राज्यात अनलॉक-५ च्या टप्याला सुरुवात झाली आहे. राज्य सरकार हळूहळू नियम शिथिल करत आहे. अशात आता ग्रंथालये सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. खासगी आणि सरकारी ग्रंथालये सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, मेट्रो देखील सुरु करण्याची परवानगी दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून मेट्रो सुरु होणार आहे. तसेच, आठवडी बाजार सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.

सरकारने याची नियमावली जारी केली असून सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. दरम्यान ५ ऑक्टोबरपासून सरकारने हॉटेल्स आणि रेस्टोरंटही सुरु केले होते. तसेच, लोकल ट्रेनच्या काही फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. मेट्रो जरी सुरु होणार असली तरी लोकल ट्रेन मात्र अद्याप सामान्य लोकांसाठी सुरु होणार नाही आहेत. तसेच, शाळा, कॉलेंजही अद्याप सुरु करण्याची माहिती देण्य़ात आली नाही आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासगी रुग्णालयातील सिटी स्कॅनचे दर निश्चित – राजेश टोपे

News Desk

जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार !

News Desk

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने सेवानिवृत्त!

News Desk