HW News Marathi
Covid-19

आता परप्रांतीयांकडून मेडिकल सर्टिफिकेट नाही, प्रवासाआधी होणार विनाशुल्क मेडिकल चेकअप

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे.

यासंदर्भात आज जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, प्रवास करु इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांची डिजिटल थर्मामीटरच्या सहाय्याने तपासणी आणि सिम्टोमॅटिक एक्झामिनेशन (रोगलक्षणात्मक तपासणी) होणे गरजेचे आहे. शासकीय तसेच महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत ही वैद्यकीय तपासणी पूर्णत: मोफत केली जाईल. किंवा महापालिकांकडून याकामी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा घेता येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, तपासणी करण्यात आलेल्या आणि एन्फ्लुएन्झासारखा कोणताही आजार न दर्शविणाऱ्या व्यक्तींची एकत्रित यादी प्रमाणित करुन वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जारी करण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही, असेही आजच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या यादीतील व्यक्ती प्रवास करु शकतील.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ची आता महाराष्ट्रात होणार निर्मिती ! 

News Desk

विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार मागे घेण्यासाठी महाविकसाघाडीची बैठक

swarit

देशात गेल्या २४ तासांत २२,२५२ नवे रुग्ण, जगाच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर

News Desk