HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत २२,२५२ नवे रुग्ण, जगाच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली | देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशाने आता रशियाला मागे टाकत जगातील आकडेवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताने कोरोनारूग्णांचा ७ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे भारतापुढची चिंता अधिकच वाढली आहे.

गेल्या २४ तासांत देशात २२,२५२ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख १९ हजार ६६५ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ४६७ लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या २ लाख ५९ हजार ५५७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ४ लाख ३९ हजार ९४८ रूग्णांन डिस्चार्ज दिला गेला आहे. एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो ६० टक्क्यांच्या वर गेला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाण्यास कंबर कसलीये, आता काँग्रेसने यापासून दूरच राहावे !

News Desk

अमित ठाकरेंचे पुन्हा या कारणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

कोरोनाच्या प्रतिकारासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सज्ज

News Desk