HW News Marathi
महाराष्ट्र

“…तुमच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावू”, ठाकरे सरकारच्या नेत्याला धमकी

मुंबई | मागील काही दिवसांपाऊसन महाविकासआघाडीवर ईडीचं सावट आहे. सत्ताधारी पक्षाने केंद्र सरकारवर याचा आरोप लावला आहे. भाजपकडून सर्व दावे फेटाळण्यात आले आहेत. यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकीचा मेसेज पाठवला असून, यामध्ये मागण्या पूर्ण केल्या नाहीतर ED आणि CBI लावू, असा इशारा देण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिलिंद नार्वेकरांना ‘तुमच्या मागे ED आणि CBI लावू’, अशी धमकी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी धमकी या अज्ञात व्यक्तीने दिली आहे.

दरम्यान, आताच्या घडीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह राज्यातील काही नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये सीबीआयदेखील चौकशी करत आहे. अनिल देशमुख यांना ईडीने अनेकदा नोटीस पाठवूनही ते चौकशीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहायला नकार देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनिल देशमुख यांनी ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोद्धेला राममंदिर भूमिपूजनाला जाणार नाहीत !

News Desk

मुंबईतील २ सहकारी बँकांसह ४ बँकांवर RBI ची कारवाई

News Desk

“तुम्ही मोठे व्हा काँग्रेसलाही मोठे करा”, बाळासाहेब थोरातांनी धवलसिंहाना साद 

News Desk