HW News Marathi
महाराष्ट्र

चक्क मुंबई विद्यापीठाला धमकीचा मेल!

मुंबई | अनेक दिवसांपासून बॉम्ब प्लांटिंगचे फेक कॉल येत आहेत. मुंबई विद्यापीठाला देखील ईमेलद्वारे बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. बी.कॉमचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा, यासाठी धमकी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाला मेलवरून धमकी आणि शिवीगाळ करण्यात येत होती. १०,११ आणि १२ तारखेला आले धमकीचे मेल आले आहेत. त्यापैकी १२ ऑगस्टच्या ईमेलमध्ये बीकॉमचे रिजल्ट्स लवकरात लवकर लावा असे, म्हणत मेलवर शिवीगाळ करत बॉम्बचे छायाचित्र पाठवण्यात आलं आहे.

निकालावरून करण्यात आला मेल

परीक्षेच्या निकालाचं कामकाज सुरु असतानाच ही धमकी आली असून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. निकाल लवकर लागले नाहीत तर विद्यापीठ उद्ध्वस्त करू अशी धमकी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या ईमेल आयडीवरून मार्च २०२१ चे परीक्षेचे निकालाचे कामकाज सुरू असताना हे धमकीचे मेल आल्याचं सांगितलं जातं आहे.

विशेष म्हणजे धमकीत ही आरोपींनी BSC, B.com, BA, यांचे 6 सेमिस्टरचे निकाल 6 च्या आत नाही लागले तर बाँम्बस्फोटाची चित्रे पाठवून विद्यापीठ उद्धवस्त करू अशी धमकी दिली होती. विद्यापीठातील डाँक्टर हे आलेले मेल तपासत असताना 9 जुलै व 10 जुलै रोजी दोन स्वतंत्र ईमेल आयडीहून ही धमकी आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई विद्यापीठाने आपल्या सर्व शैक्षणिक विभागांतील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार आहेत. याची कालपासून म्हणजेच १२ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी प्रतिसाद दिला आहे. अंतिम गुणवत्ता यादी २ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता जाहीर होणार आहे.

कसं असेल वेळापत्रक?

– नोंदणी प्रक्रिया आणि अर्ज सादर करणे – १२ ऑगस्टपासून २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत

– ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी – २६ ऑगस्टपासून ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत

– तात्पुरती गुणवत्ता यादी- ३० ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता

– विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास सादर करणे- ३१ ऑगस्ट

– अंतिम गुणवत्ता यादी २ सप्टेंबरला ६ वाजता जाहीर होणार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘साजिशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिये’ छगन भुजबळांची निर्दोष मुक्तते नंतर पहिली प्रतिक्रिया

News Desk

फळे, फुलांपासून मद्यार्क निर्मितीच्या धोरणास मान्यता; मंत्रिमंडळाचा निर्णय

Aprna

मुंबई महाराष्ट्राची होती…आहे…आणि राहिल – अजित पवार

News Desk