HW News Marathi
महाराष्ट्र

बुलडाण्यात बैलांची दुधाने आंघोळ घालत स्वाभिमानी संघटना आंदोलनात सहभागी

बुलडाणा | सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला १० रुपये अनुदान द्यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर रस्त्यावर उतरली आहे. बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी चक्क बैलांना दुधाची आंघोळ घालुन आंदोलन केले आहे.

सरकारने दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे,दुध पावडरला प्रति किलोला ५० रुपये अनुदान द्यावे. व तुप, दुध पावडर, व बटर यावरील जी एस टी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातुन करण्यात आली आहे. सरकारने राजु शेट्टी यांच्या दुध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल असा ईशारा या आंदोलनातुन सरकारला देण्यात आला आहे.

आज चर्चा होणार…

राज्यात दूध आंदोलन पेटले आहे. अनेक स्तरातून शेतकरी आक्रमक झाले आहेत. दुधाला योग्य भाव मिळावा अशा त्यांच्या मागण्या आहेत. राज्यात गेल्या चार महिन्यांपासून ‘कोरोना‘मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी करत आहेत.

यावर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला महानंद‘ चे अध्यक्ष, दूग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनेचे प्रमुख, तसेच राज्यभरातील दूध संघांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता मराठ्यांच्या गनिमी कावा आंदोलन

News Desk

अखेर जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मुहूर्त ठरला

Gauri Tilekar

कंगणाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख!

News Desk