HW News Marathi
महाराष्ट्र

दुध आंदोलनाचा भडका झाला अधिक तीव्र !

मुंबई | दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी २० जुलैपासून संपूर्ण राज्यभरात आंदोलन सुरु आहे. आज (१ ऑग्स्ट) राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह भाजपने या आंदोलनात उडी घेतली आहे. राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर खूप कमी झाले होते. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले होते. दुधाच्या पावडरसाठी सुद्धा दर कमी झाला होता. त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. याचं पार्श्वभूमीवर विविध पक्षाच्या वतीने व संघटनांच्या वतीने आंदोलनाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली.

बारामती यापूर्वीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दूध दरवाढीसाठी राज्यपाल मोठे आंदोलन झाले होते. आज राष्ट्रीय समाज पक्ष भारतीय जनता पार्टी व क्रांती संघटनेच्या वतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरू आहे. बारामती येथे अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या काटेवाडी गावात देखील भाजपच्या वतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी दुधाची गाडी अडवत दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून देत दूध दर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दूध दरवाढीचे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अमोल सातकर माणिकराव धांगडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते दुधाला ३० ते ३५ रुपये भाव मिळाला पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

काय आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

१. प्रति लिटर दुधाला १० रु अनुदानाची मागणी

२. ३० रुपये दुधाला हमी भाव द्या

३. बाहेरुन आयात होणारी दुध पावडर बंद करा

४. जेनेरिक मेडीसिनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतच दुध व दुग्धपदार्थांच्या आयातीला परवानगी दिल्याने निर्णय रद्द करा

५. देशांतर्गत गोदामांचे पडून असलेल्या दुध पावला निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बघून घेईन ! अर्णब गोस्वामींची मुख्यमंत्र्यांना लाईव्ह कार्यक्रमात थेट धमकी

News Desk

राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी, त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही!

News Desk

राहुल गांधींच्या कारवाईवर ‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

Aprna