HW News Marathi
महाराष्ट्र

आजही तुम्ही आमच्यात नाहीत ही गोष्ट मन मान्य करत नाही ! | धनंजय मुंडे

परळी | माजी केंद्रीय मंत्री दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुतणे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (१२ डिसेंबर) गोपीनाथगड येथील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. परळी तालुक्यातील गोपीनाथगड या स्मृतिस्थळी धनंजय मुंडे यांनी येऊन दर्शन घेतले.

यावेळी गोपीनाथ मुंडे ज्याप्रमाणे गोरगरीब दीन दुबळ्यांची सेवा करत, त्याचाच वसा घेऊन, त्यांच्याच संघर्षाचा वारसा आणि प्रेरणा घेऊन आपण काम करत असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी दुपारी ४ वाजता पांगरी येथील गोपीनाथ गडावर जाऊन अभिवादन केले. मुंडे साहेबांना ते अप्पा म्हणत. अप्पांच्या चरणी सदैव नतमस्तक असल्याचे म्हणत धनंजय मुंडेंनी लहानापासून गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सान्निध्यात घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण कुठे अडलंय | खासदार उदयनराजे भोसले

swarit

रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती

Aprna

आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा, तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना! – गोपीचंद पडळकर

Aprna