HW News Marathi
Covid-19

“तुम्हाला माझ्या लग्नाची एवढी चिंता का?” आदित्य ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना सुनावले

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा तोल घसरल्याचे पाहायला मिळाले. “आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्रालाच पत्र लिहतील”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेला आता खुद्द पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीच प्रत्युत्तर देत बोचरा टोलाही लगावला आहे. “तुम्हाला माझ्या लग्नाची एवढी चिंता का?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी थेट चंद्रकांत पाटील यांना केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भात मी वेगळी चर्चा करेन. आता वातावरण चांगलं ठेवा. आता राहिला प्रश्न माझ्या लग्नाचा तर माझ्या लग्नाची एवढी चिंता का?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तर, आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपांवर बोलण्यास आदित्य ठाकरे यांनी नकार दिला आहे. दरम्यान, राज्य सरकार वारंवार केंद्र सरकारवर करत असलेल्या टीकेमुळे चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “राज्य सरकार काहीही झालं तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवतं. त्यामुळे उद्या आदित्य ठाकरे यांना लग्नासाठी मुलगी जरी बघायची वेळ आली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केंद्र सरकारलाच पत्र लिहतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांची मंत्रालयात गरज, मात्र मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरायला हवं !

News Desk

सेलिब्रिटींना, राजकारण्यांना कोरोनावरील औषधे कोण पुरवते!

News Desk

कोविड रुग्णालयातच कोरोना बाधित रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या!

News Desk