HW News Marathi
Covid-19

मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो कि … ! वाझेंच्या आरोपांवर अनिल परबांचे स्पष्टीकरण

मुंबई | “बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो मी खंडणी घेतली नाही”, असे स्पष्टीकरण देत राज्याचे परिवहन अनिल परब यांनी सचिन वाझेंच्या आरोपांचे खंडण केले आहे. कारण, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी राज्याला हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला आहे. “आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला आहे. त्याचसोबत, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर आता एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिलं आहे. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर भाजपदेखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले अनिल परब ?

* सचिन वाझेंनी पत्रात केलेले आरोप धादांत खोटे आहेत.

* मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. माझ्यावर असे कोणतेही खंडणीचे संस्कार नाहीत.

* मी बाळासाहेबांची आणि माझ्या २ मुली आहेत त्यांची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगतो कि, हे सगळे आरोप खोटे आहेत. हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

* गेले २-३ दिवस भाजपचे पदाधिकारी जो आरडाओरडा करत होते कि ह्यात आम्ही अजून तिसरा बळी घेऊ ह्याचा अर्थ त्यांनी हे प्रकरण शिजवले आहे.

* सरकारला बदनाम करण्यासाठीच भाजपने हे प्रकरण तयार केले आहे. कारण, सचिन वाझे आज कोर्टात पत्र देणार याची कल्पना कदाचित त्यांना आधीपासूनच असेल. म्हणूनच, ते आधीपासून याचा गाजावाजा करत होते.

* याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा हाताशी घेऊन सचिन वाझेंकडून पत्रातून हे आरोप केलेले आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोना चाचणी लॅब २ वरून ११० वर पोहोचल्या – मुख्यमंत्री

News Desk

राज्यात ६५ लाख ५५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप, छगन भुजबळ यांची माहिती

News Desk

नफेखोरी करणाऱ्या मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा !

News Desk