HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

काहींनी ५ वर्षात कारखान्यावर २५० कोटी कर्ज करून ठेवले ! धनंजय मुंडेंचा टोला

बीड | ऊसतोड कामगारांना त्यांच्या हक्काची भाववाढ मिळणे यासाठी आपण सातत्याने राज्य शासन स्तरावर प्रयत्नशील असून मंगळवारी (२७ ऑक्टोबर) रोजी साखर संघसह, सहकार, कामगार आदी विभागांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. भाववाढ हा प्रश्न योग्य भाव मिळवून देऊनच मिटवू असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या साखर पूजन समारंभात धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी संपूर्ण कारखान्याची पाहणी केली.

यंदा चांगल्या पावसाने उसाचे पीक जोरदार असून, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या या कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला योग्य भाव मिळत आहे, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. तेव्हा यावर्षी एफआरपीपेक्षा ५० ते १०० रुपये प्रतिटन भाववाढ देऊ असा शब्द सोनवणे यांनी दिला.

काहींनी ५ वर्षात कारखान्यावर २५० कोटी कर्ज करून ठेवले !

बजरंग सोनवणे यांनी आपले विचार मांडताना येडेश्वरी साखर कारखाना स्थापन केल्यापासून या 7 वर्षात कारखान्याकडे असलेले 70 कोटी रुपये कर्ज परतफेड करून अंतिम टप्प्यात आणले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी धनंजय मुंडेंनी त्यांचे कौतुक करतच तुम्ही 7 वर्षात कर्ज फेडले, आता नवीन प्लांट उभा करत आहात, परंतु मी ज्या कारखान्याचा सदस्य आहे, त्या कारखान्यावर संचालक मंडळाने 250 कोटींचे कर्ज करून ठेवले आहे, असा टोला धनंजय मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

ऊसतोड मजुरांच्याबाबतीत आम्ही पूर्वीच्या सरकारप्रमाणे केवळ गप्पा मारणार नाही !

ऊसतोड मजुरांच्याबाबतीत आपण पूर्वीच्या सरकारप्रमाणे केवळ गप्पा मारणारे नसून प्रत्यक्ष कृती करणारे आहोत, ऊसतोड कामगारांच्या जीवनात आर्थिक उत्कर्ष साधून, मजुराचा ऊस उत्पादक झाला पाहिजे, तेव्हाच खरे समाधान मिळेल असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Related posts

खडसे यांना अडकवण्यासाठी भाजपच्याच नेत्याने सुपारी दिली होती

News Desk

ग्रंथालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा आदेश; मेट्रो देखील १५ऑक्टोबरपासून सुरु होणार  

News Desk

अन् राहता राहिला प्रश्न शरद पवारांचा तर…!

News Desk