HW News Marathi
Covid-19

मी हात जोडतो, लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळा !

बीड | कोरोनाचा वाढलेला प्रभाव लक्षात घेत प्रशासनातील प्रत्येक घटकाने गांभीर्यपूर्वक काम करावे, कोरोनाविरूद्धची ही लढाई निकराची असून, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे व निर्वानीचे आहेत. जिल्ह्यात कुठेही बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडीसीविर किंवा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता भासणार नाही, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

हात जोडतो, लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळा !

“मागील वर्षी बीड जिल्ह्यातील जनतेने प्रशासनाला प्रत्येक निर्णयात सहकार्य केले, त्यामुळे जानेवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नगण्य होती, मात्र गेल्या तीन महिन्यात ही संख्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाने भरमसाट वाढली आहे, मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे, संपूर्ण बीड जिल्हा हेच माझे कुटुंब आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या जीवांचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी मंत्री म्हणून नाही तर, कुटुंबातील सदस्य म्हणून हात जोडतो, लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा”, अशी भावनिक साद यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी जिल्हा वासीयांना घातली आहे.

धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे बोलत होते.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, मृत्युदर देखील वाढला असुन, योग्य उपचार, बेड ची उपलब्धता यासह ऑक्सिजन, रेमडीसीविर इंजेक्शनची वेळेवर व रास्त भावात उपलब्धी या सर्वच बाबींवर धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

बीड जिल्ह्याला ऑक्सिजनच्या बाबतीत पुन्हा एकदा आत्मनिर्भर बनवू !

बीड जिल्ह्याला ऑक्सिजनच्या बाबतीत पुन्हा एकदा आत्मनिर्भर बनवू, जिल्ह्यात कुठेही एक लिटर ऑक्सिजन देखील कमी पडणार नाही, अशी खात्री यावेळी ना. मुंडेंनी दिली. तर दुसरीकडे रेमडीसीविर या इंजेक्शनचा तुटवडा भासत असून, साठेबाजी व काळाबाजार करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत, याबाबत प्रभावी यंत्रणा राबवून दैनंदिन तत्वावर नियंत्रण समिती स्थापन करावी, ज्यांना आवश्यक त्यांनाच इंजेक्शन व तेही रुग्णालयामार्फत ही प्रणाली तातडीने विकसित करावी. जिल्ह्यात आलेले इंजेक्शन व वितरण याचे दररोज ऑडिट या यंत्रणेमार्फत केले जावे, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत.

रुग्णांच्या व्यवस्थापनापासून ते इतर सर्वच बाबींमध्ये प्रशासकीय व्यक्तीकडून हलगर्जीपणा झाल्याचे उघड झाल्यास त्यावर कार्यवाही करू, कोणीही व्यक्ती किंवा समूह रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत ठरत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास धनंजय मुंडेंनी दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोनाबाधितांचा आकडा २७,८९२, तर एका दिवसात ३८१ रुग्णांना डिस्चार्ज

News Desk

कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करा -अजित पवार

News Desk

हा अजित पवारांचा दांभिकपणा…दखल घ्या, कुचेष्टा करू नका ! चंद्रकांत पाटील संतापले

News Desk