HW News Marathi
महाराष्ट्र

“पंकजांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या का?”; धनंजय मुंडे म्हणाले, “नाही, पण…”

मुंबई । दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक बारामतीत गोविंदबागेत जमत असतात. अर्थात यावेळी पक्षाचे बडे नेतेही उपस्थित असतात. याच पार्श्वभूमीवर, आज (५ नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनीही शरद पवारांची भेट घेतली. यावेळी, “पंकजा मुंडेंनी तुम्हाला दिवाळीच्या आणि उद्याच्या भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या का?” असा प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे मिश्कील उत्तर दिलं आहे.

पंकजा मुंडेंबाबतच्या प्रश्नावर धनंजय मुंडे म्हणाले की, “नाही. मला अजून तरी शुभेच्छा आलेल्या नाहीत. पण जर मला शुभेच्छा आल्या तर आपल्याला नक्की कळवलं जाईल.” पुढे धनंजय मुंडे म्हणाले की, आमचे दैवत असलेल्या शरद पवारांना भेटण्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो. त्यांना भेटल्यावर एक ऊर्जा मिळते.

“आम्ही भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!

पवार कुटुंबाशी निगडित व्यक्तींवर सध्या केंद्रीय यंत्रणांकडून सातत्याने छापेमारी सुरू आहे. याबाबत प्रश्न केला असता उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, “आमच्या शक्तीपीठांवर हल्ला करून भाजपच्या विचार धारेला काहीतरी यश मिळेल असं वाटतंय. पण महाराष्ट्राच्या मातीत भाजपला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.” यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी बारामतीत शरद पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचं स्वागतच करावं लागेल !

News Desk

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव-शरद पवार एकत्र

News Desk

सारथी जिवंत ठेवण्याबाबत महाविकास आघाडी व शरद पवारांची जबाबदारी – छत्रपती संभाजी राजे यांचे प्रतिपादन

News Desk