HW News Marathi
Covid-19

रेमीडिसिव्हीरच्या मागणीसाठी धनंजय मुंडेंचा ताफा अडविला!

बीड । बीड जिल्ह्यात रेमडेसिवीरचा प्रचंड तुटवडा आहे. दररोज 1000 ते 1200 इंजेक्शनची गरज असताना दोन ते तीन दिवसाला 400 ते 500 इंजेक्शन जिल्ह्यात येत आहेत. आताही जिल्ह्यात 2500 इंजेक्शनची वेटींग असताना 3 दिवसांपासून इंजेक्शन देण्यात आलेले नाहीत. आता तर रजिस्ट्रेशन करू नका म्हणून सांगितले जात आहे. त्यामुळे नातेवाईक संतप्त झालेले असून आज (१ मे) त्यांनी माजलगावात पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा अडवून रेमडेसिवीरची मागणी केली. मात्र मुंडे यांनी नातेवाईकांची कशीतरी समजूत काढून तेथून काढता पाय घेतला.

धनंजय मुंडे हे माजलगावात एका कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाला आले होते. कार्यक्रम आटोपून ते परळीला जात असताना सामाजिक कार्यकर्ते मनोज फरके यांनी संभाजी चौकात त्यांचा ताफा अडवून इंजेक्शनची मागणी केली. यावर धनंजय मुंडेंनी “कुणाकुणाला इंजेक्शन हवे आहेत, असे म्हणत यादी मला व्हॉटसअप करा, सगळ्यांना इंजेक्शन देतो”, असे सांगितले. फरके म्हणाले, मागील तीन दिवसांपासून इंजेक्शन मिळत नाहीत. अधिकारी दररोज वेगळा नियम काढत आहेत. आजपासून त्यांनी रजिस्ट्रेशन बंद केले आहे. 24 एप्रिल रोजी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यातील एकालाही इंजेक्शन देण्यात आले नाही, असा तक्रारींचा पाढा वाचला. मात्र मुंडे यांनी गर्दी होण्यापूर्वीच तिथून काढता पाय घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोकळ घोषणा देणारे माहविकासआघाडीचे सरकार नाही | मुख्यमंत्री

News Desk

मुंबईत रोगप्रतिकारशक्ती विषयक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे – मुख्यमंत्री

News Desk

अजित पवारांनी शरद पवारांसमोर पुण्याच्या महापौर मुरलीधर मोहोळांचे तोंड भरून केले कौतुक

News Desk