HW News Marathi
महाराष्ट्र

“कुणाचाही आधार घेईन, पण एक रासपचा पंतप्रधान नक्की होईन”, महादेव जानकरांची गर्जना

कोल्हापूर | रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. ” मी कुणाचा गुलाम म्हणून फिरत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस रासपाचा पंतप्रधान जरुर होईल असा दावा जानकर यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते. काँग्रेस- राष्ट्रवादीचा रस्ता डांबरीकरणाचा आहे, तर भाजपचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. मी मात्र पाणंदीने पुढे चाललो आहे. माझाही सूर्य कधी तरी उगवेल अशी देखील आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या ४ तारखेला राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली आहे. सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर विचारला असता ते माझ्या पक्षात नाहीत, त्यांच्यावर बोलून त्यांना का मोठं करू असं म्हणत त्यांनी यावर बोलणं टाळलं आहे.

पंतप्रधानपदाबाबत बोलताना जानकर म्हणाले आहेत की, “आमच्या पक्षाचं ध्येय हे दिल्ली आहे. टार्गेट दिल्ली ठेवून आमच्या पक्षाची वाटचाल सुरु आहे. मी एक ना एक दिवस पंतप्रधान जरुर होईन. त्यासाठी मला कुणाचीही मदत घ्यावी लागली, कुणाचाही आधार घ्यावा लागला तर ती घेईन पण मी पंतप्रधान होणारच”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहूल गांधी मेहनत करतयात पण कुठेतरी काही कमी पडतयं… – सामना

News Desk

भिडेंच्या वक्तव्याचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलकडून निषेध

News Desk

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची जामीनावर सुटका; तब्बल 18 दिवसांनी तुरुंगातून बाहेर

Aprna