HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या… बच्चू कडू यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाईन का केले?

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २१५ वर पोहचली आहे. तर देशात १ हजार १९० वर गेली आहे. केंद्र आणि राज्या सरकार देशात ओढवलेल्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कोरोनाची तपासणी करू घेतली असून त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांनी ताप आणि खोकला आला असून त्यांना स्वत:ला कोरोना झाल्याची भीती वाटू लागली होती. यामुळे बच्चू कडू यांनी स्वत:ला गेल्या पाच दिवसापूर्वीच आपल्या आमरावतीच्या निवास्थानी होम क्वारंटाईन करू घेतल्याची माहिती मिळाली होती. यानंतर बच्चू कडू यांनी २६ मार्चला कोरोनाची तपासणी करू घेतली. मात्र, बच्चू कडू यांची कोरोना तपासणी निगेटिव्ही आल्याने त्यांनी सुटकेचा श्वसा घेतला आहे.

नुकतेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या कोरोना झालेली माहिती दिली. तर याआधी ब्रिटनच्या राजकारण्यातील प्रिंस चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच कोरोनाने संपूर्ण जगाला विळख्यात घेतले आहे. यात महासत्ता अमेरिका, इटली आणि स्पेन या सारखे देशातही कोरोनाने हाहाकार माजला आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अपयश लपण्यासाठी हा छाती बडवण्याचा प्रकार आहे…

News Desk

“प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण…”, रोहित पवारांचा फोटो ट्विट करत पडळकरांचा इशारा

News Desk

सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार? – कंगना राणावत

News Desk