HW News Marathi
Covid-19

इंदापूरमध्ये माय-लेकींची कोरोनावर मात, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची खास उपस्थिती

इंदापूर | इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथे आलेल्या कुटुंबातील अकरा वर्षाच्या मुलीसह तीची आई तपासणीत कोरोना पाॅझिटीव्ह आढळली होती त्यांना इंदापूर येथील कदम गुरूकुलमध्ये पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले होते.उपचारादरम्यान ११ वर्षीय चिमुरडीसह तीच्या आईने कोरोनावर मात केल्याने दोघांनाही आज (२९ मे) सकाळी नऊ वाजता कदम गुरूकुल येथुन डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉग्रेस चे पूणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तहसीलदार सोनाली मेटकरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुरेखा पोळ, इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय अधिक्षक एकनाथ चंदनशिवे यांनी कदम गुरूकुल येथे उपस्थीत राहुन चिमुरडीसह तीच्या आईचे पुष्प वर्षावाने स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

इंदापूर तालुक्यात एकूण ५ रुग्ण आढरून आले होते,त्या पैकी एक महिला रुग्णाचा मृत्यू झाला असून ४ पैकी २ रुग्ण बरे होऊन घरीं परतले आहेत. कोरोना विषाणू रोखण्यास इंदापूर प्रशासनाला यश आले असून दोन रुग्ण बरे झाले असल्याने या मुळे आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सुरु होणार नाही!

News Desk

दिल्लीतील ११ जिल्हे १७ मेपर्यंत रेड झोनमध्ये राहणार

News Desk

मोदी सरकारनंच अदर पुनावालांना धमकी दिली, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

News Desk