HW News Marathi
Covid-19

पुणे महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर तुळशीबाग मार्केट १ जूनपासून सुरू होणार

पुणे | राज्यात पुण्यातील खरेदीसाठी प्रसिद्ध असलेले तुळशीबा मार्केट हे १ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाने परवानगी मिळाल्यानंतर तुळशीबाग मार्केट पूर्ववत सुरू होणार आहे. राज्यातील लॉकडाऊनमुळे तुळशीबाग मार्केट हे गेल्या अडीच महिन्यापासून बंद होते.

तुळशीबा मार्केटबरोबरच पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडई ही सुद्धा १ तारखेपासून सुरक्षेसंदर्भातील सर्व उपाय योजना राबवून मार्केट सुरू होणार आहे. तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेने यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. सुरक्षेसंदर्भात उपाययोजना राबवून मार्केट सुरु करण्याची हमी संघटनेने दिली होती.

या पार्श्वभूमीवर तुळशीबागेतील दुकानदार व कामगारांनी त्यांच्या दुकांनाची सामफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. तर पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तुळशीबाग परिसरात सुमारे ३०० दुकाने आहेत. एक दिवसाआड एक दुकान सुरु करण्याचा व्यापाऱ्यांचा विचार आहे. दुकाने सुरू करताना तुळशीबागेच्या सहा गल्ल्यांच्या एन्ट्री पॉईंटला सुरक्षारक्षक नेमले जाणार आहे.

दरम्यान, तुळशीबागेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे सॅनिटायझेशन करण्यात असून ग्राहकांचे तापमान देखील तपासले जाईल, अशी माहिती तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनने दिली. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडईसुद्धा एक तारखेपासून सुरु होणार आहे. यामुळे पुणेकरांची भाजीपाल्याची समस्या मिटणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शाह श्वसनाच्या त्रासामुळे पुन्हा ‘एम्स’मध्ये दाखल 

News Desk

“योग्य कोण, पंतप्रधान कि तुम्ही?”, जयंत पाटलांचा बोचरा सवाल

News Desk

दिलासादायक! राज्यात आज १५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

News Desk