मुंबई | पवारसाहेब, मुख्यमंत्री आणि आमचं नेते या लढाईत माझ्या पाठिशी उभे आहेत. आणि कालच मुख्यमंत्र्यांनी माझं कौतुक केल्याचं राज्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. “कोणी प्रचारित करतं की, नवाब मलिक हे एकटं पडलं, एकटंच लढतायत. पण, मी लोकांना सांगू इच्छितो की, सीएमसाहेब, पवारसाहेब, सरकारचे आणि पक्षांचा पाठिंबा आहे, असे मलिकांनी आज (११ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत सांगितलं.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि या प्रकरणात आर्यन खानची अटक असो की, या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचं अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गेल्या महिनाभरापासून आरोप-प्रत्यारोप होत आहे. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांच्या जावयासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये हेवेदावे सुरू झालं आहेत.
गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्ज जप्त
गुजरातमधील द्वारकामध्ये जवळपास ३५० कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. गुजरात पोलिसांनी जवळपास १६ किलो हेरॉईन आणि एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. हे ड्रग्ज पाकिस्तानच्या समुद्राच्या मार्गे येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून ड्रग्ज जप्त केलं
फडणवीसांवर मानहानीचा दावा
महाराष्ट्राचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांचं जावई यांच्याबद्दल बदनामी करणारं व्यक्तव्य केले आहे. समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडले होतं, असे फडणवीस म्हणालं. फडणवीसांच्या वक्तव्यविरोधात मलिकांची मुलगी नीलोफर यांनी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी फडणवीसांनी माफी मागावी नाही तर क्रिमिनल आणि सिव्हिल सूट फाईल आहे, असे म्हणालं. तसेच प्रत्येक व्यक्तीला राईट टू स्पीक आहे. मात्र, राईट टू अब्यूस असा अधिकार नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.