HW News Marathi
देश / विदेश

रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच रावसाहेब दानवे लोकल प्रवासाबद्दल म्हणाले…

नवी दिल्ली | मोदींच्या दुसऱ्या टर्मच्या मंत्रिमंडळाचा जम्बो विस्तार काल (८ जुलै) पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील ४ नेत्यांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे. यावेळी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्रीपद दिलं आहे. रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर दानवेंनी महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास करण्यास बंदी घातली आहे. मात्र, वसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाचा चार्ज घेताचं लोकलबद्दल महत्त्वाची घोषणी केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी पदभार स्वीकारताना दिलं आहे.

लोकल बद्दल दानवे म्हणाले की, ‘जेव्हा राज्याला वाटेल कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे. तेव्हा राज्याने यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर त्यावर योग्य आभ्यास करून त्याठिकाणी रेल्वे व्यवस्था सुरळीत करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. राज्य सरकारने विनंती केल्यास तातडीने लोकल सेवा सुरु करु’ असं दानवे म्हणाले आहेत.

मंत्रीमंडळ

नरेंद्र मोदी – विज्ञान-तंत्रज्ञान

अमित शाह – गृहमंत्री, सहकार

पीयूष गोयल – वस्त्रोद्योग

स्मृती इराणी – महिला बाल कल्याण

ज्योतिरादीत्य सिंदीया – नागरी विमान वाहतूक मंत्री

धर्मेंद्र प्रधान – शिक्षण

नारायण राणे – मध्यम आणि लघु उद्योग

हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम, शहर विकास

सारबानंद सोनोवाल – बंदर आणि जलवाहतूक मंत्री, आयुष मंत्रालय

मनसुख मांडवीय – आरोग्य

अश्विनी वैष्णव – रेल्वे, माहिती तंत्रज्ञान

अनुराग ठाकूर – माहिती प्रसारण

गिरीराज सिंह – ग्राम विकास

आर के सिंग – ऊर्जा

किरण रिजीजू – सांस्कृतीक

पशुपतीकुमार पारस – अन्न प्रक्रिया मंत्री

गजेंद्रसिंह शेखावत – जलशक्ती मंत्री

पुरुषोत्तम रुपाला – मासेमारी, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री

राज्य मंत्री

भारती पवार – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री

कपिल पाटील – पंचायतराज राज्य मंत्री

रावसाहेब दानवे – रेल्वे राज्यमंत्री

भागवत कराड – अर्थ राज्य मंत्री

भगवंत खुबा – अपारंपरिक उर्जा विभाग आणि खते-रसायन विभाग राज्यमंत्री

प्रतिमा भौमिक – सामाजिक न्याय राज्यमंत्री

सुभास सरकार – शिक्षण राज्यमंत्री

राजकुमार रंजन सिंह – परराष्ट्र विभाग आणि शिक्षण राज्यमंत्री

विश्वेश्वर टुडू – आदिवासी विकास आणि जलशक्ती विभाग राज्यमंत्री

शांतनु ठाकूर – बंदर, जलवाहतूक राज्यमंत्री

मुंजपरा महेंद्र – महिला व बालकल्याण आणि आयुष विभाग राज्यमंत्री

जॉन बारला – अल्पसंख्याक राज्यमंत्री

एल. मुरुगन – मासेमारी, पशुपाल आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री, माहिती व प्रसारण राज्यमंत्री

निसिथ प्रामाणिक – गृह राज्यमंत्री, युवा आणि क्रीडा राज्यमंत्री

अनुप्रिया पटेल – उद्योग राज्यमंत्री

एस. पी. बघेल – कायदा व न्याय राज्यमंत्री

राजीव चंद्रशेखर – कौशल्य विकास, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री

शोभा करंदलजे – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री

दर्शन जरदोश – टेक्स्टाईल, रेल्वे राज्यमंत्री

व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र, संसदीय कार्य राज्यमंत्री

मीनाक्षी लेखी – परराष्ट्र, सांस्कृतिक राज्यमंत्री

अन्नपूर्णा देवी – शिक्षण राज्यमंत्री

अजय भट – संरक्षण, पर्यटन राज्यमंत्री

अजय कुमार – गृह राज्यमंत्री

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पारंपरिक सोने खरेदीला छेद, ऑनलाइन बाजारात सोन्याला झळाळी

News Desk

शरद पवारांनीच केला मोदींसोबतच्या भेटीचा खुलासा

News Desk

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk