HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई राजकारण

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे ! । वडेट्टीवार

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून याच पार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “महाराष्ट्रातली कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. त्याचप्रमाणे मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सुरु आहे.” दरम्यान, वडेट्टीवार यावेळी Tv9 या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

विजय वडेट्टीवर नेमके काय म्हणाले ?

राज्यातील कोरोना वाढत्या प्रादुर्भावावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, “महाराष्ट्रातली एकूण वाढती कोरोना रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. शासन पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. मात्र उपाययोजना जरी सुरु असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल हे आज सांगता येत नाही. परंतु, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असे आपण म्हणू शकतो”, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

त्यापुढे बोलताना वडेट्टीवार असेही म्हणाले की, “सद्यस्थितीत लॉकडाऊन परवडणार नाही. अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढणे हे देखील गंभीर आहे. त्यामुळे, राज्यातील काही शहरांमध्ये कडक निर्बंध लागू लागतील.”

मुंबईच्या लोकल फेऱ्या कमी होणार?

मुंबईतील कोरोनास्थितीबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “मुंबईतही कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरू आहे. मुंबईत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार येईल.”

Related posts

सेक्सिस्ट कॉमेंट्स करणाऱ्यांना राजकारणात स्थान नाही !

News Desk

आरेतील मेट्रो कारशेडला विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे

News Desk

“संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान”, भाजप सरपंचाने दिला राजीनामा

News Desk