पिंपरी चिंचवड | पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटनासमोर आली आहे. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही सर्व संतापजनक घटना हिंजवडी परिसार घडली आहे. या बलात्कार प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या बलात्कार प्रकरणी पोलिसांनी गणेश निकम (२२) याला अटक केली आहे.
काय आहे नेमकी घटना ?
कासारसाई येथील दोन मुली रविवारी मंदिर परिसारत खेळायला गेल्या होत्या. आरोपी गणेश आणि त्याच्या साथीदाराने या दोन्ही अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून मंदिरामागील जंगलात नेले आणि त्या दोन निरागस मुलींवर बलात्कार केला. या प्रकाराबद्दल कोणाला काहीही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपींनी धमकी दिल्यानंतर या दोन्ही मुलींनी कुटुंबीयांना काही सांगितले नाही. या दोन्ही मुलींचे पालक हे ऊसतोड कामगार आहेत. दोन्ही पैकी एक मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर पालकांनी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी दरम्यान मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. या बलात्कार प्रकरणाची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. परंतु मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे पोलिसांना माहिती मिळवण्यासाठी अडथळे येत होते. मात्र दुसऱ्या मुलीने हिम्मत करून तिच्या कुटुंबीयांना सर्व सांगितले. त्या मुलींच्या पालिकांना तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींला ताब्यात घेता आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.