HW News Marathi
Covid-19

मुंबई पूर्ववत होण्याच्या मार्गावर…!

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन महिने संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्रातही लॉक डाऊन सुरू आहे मात्र हळूहळू केंद्र तथा राज्य सरकारने लोक डाऊन चे नियमांमध्ये शीतलता देण्यास सुरुवात केली आहे.राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन या धोरणाची घोषणा केली होती.त्यानुसार आजपासून ( ५ जून) महाराष्ट्रात आणि मुंबईत अनेक बाबी या पूर्ववत होणार आहेत. कठोर निर्बंध असलेल्या मुंबईत आजपासून काही गोष्टी सुरु होणार आहेत. बाजारपेठा, दुकाने सुरु होणार असली तरी तिथे आता आपल्याला पुर्वीसारखी गर्दी करता येणार नाही. काही गोष्टींचे आणि नियमांचे आपल्याला पालन करावे लागणार आहे.

काय सुरू होणार…?

* मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत प्रवासासाठी परवानगीची अट काढून घेण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईँदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ येथे नागरिकांना आता विनापरवानगी प्रवास करता येणार आहे.

*पहाटे ५ ते रात्री ७ या वेळेत नागरिकांसाठी उद्याने, मैदाने खुली करण्यात आली आहेत. यावेळेत नागरिक व्यायाम, जॉगिंग, सायकल चालवू शकतात. मात्र, यावेळी व्यायामाचे साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही.

* दुकाने सम-विषम नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकाने सुरु राहतील. नियमांचे पालन होईल यासाठी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट आणि दुकाने मालक असोसिएशनला चर्चेत सहभागी करुन घ्यावे. यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन महत्वाचे असणार आहे.

* कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसणार आहे. शिवाय कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करण्याचीही परवानगी नसणार आहे.

* रविवारपासून ७ जून २०२० पासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

* शैक्षणिक संस्थांचे (शाळा/कॉलेज/विद्यापीठ) कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोना रुग्णांची संख्या ९ लाखांच्या पार, गेल्या २४ तासात २८,४९८ नवे रुग्ण

News Desk

‘देशात ऑक्सिजन टंचाईमुळं रुग्णांचा मृत्यू झाला’, केंद्र सरकारची कबुली

News Desk

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण

News Desk