HW News Marathi
महाराष्ट्र

“भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

पंढरपूर | पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीला धुळ चारत भाजप उमेदवार विजयी झाला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालकेंच्या अकाली निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली होती. यात भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भाजपकडून समाधान आवताडेंना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणूकीच्या या निकालावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत भारतनानांची माफी मागितली आहे. “भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

अमोल मिटकरींचे ट्वीट

भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले, असे ट्वीट अमोल मिटकरींनी केले आहे.

 

पोटनिवडणूकीचा निकाल

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला आहे. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी काल (2 मे) पार पडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंनी दखल घेतल्याने नांदगाव परिसरातील प्रदूषणाची तीव्रता कमी

Aprna

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या – जयंत पाटील

News Desk

बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना खुशखबर; रावसाहेब दानवेंनी मोठी घोषणा

News Desk