HW News Marathi
महाराष्ट्र

“माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मी घाबरून घरात बसलो तर यांनी कोणाच्या दारात बसायचं” – निलेश लंके

अहमदनगर | राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्यांनी कोविड केअर सेंटरची उभारणी केली. “माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत, हे शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे आहेत. मतदारसंघातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्य सेवेचा निर्धार त्यांनी केला आहे.

अहमदनगरला आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर मुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे आमदार लंके स्वतः रात्रंदिवस या कोविड सेंटर मधील रुग्णांची देखभाल करत आहेत. त्यामुळे लंके यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कोविड सेंटर सुरू केल्यापासून आतापर्यंत भरभरून मदत या सेंटर ला मिळाली आहे.

ना कोणता थाट…. ना कोणता रुबाब….. जनसामान्यांचा आधार अशी ओळख निर्माण झालेले राष्ट्रवादीची आमदार निलेश लंके सध्या आपल्या कामामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याच कारणही तसेच आहे. लोकप्रतिनिधीचं खर काम काय असते हे निलेश लंके यांनी दाखवून दिले आहे. लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल 1 हजार 100 बेडच कोविड सेंटर उभारले आहे. त्यात 1000 बेड आणि ऑक्सिजन युक्त 100 बेड आहेत.

परदेशातून मदतीचा ओघ

आमदार निलेश लंके यांनी या कोविड सेंटरला शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर असे नाव दिले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लंके यांच्यामार्फत सुरु केलेल्या आरोग्य केंद्रांची महती सर्वदूर पोहोचली. त्यामुळे मदतीचा ओघही सुरुच आहे. परदेशातून अनेक जण थेट खात्यावर रक्कम पाठवित आहेत. तर माझ्या राजकीय कारकिर्दीत आतापर्यंत इतका प्रतिसाद मी पहिला नाही, असं मत लंके यांनी व्यक्त केलेय. माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माजी लोक सुरक्षित असली पाहिजे असा निर्धार लंके यांनी केला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही कोविड सेंटरची उभारणी

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील लंके यांनी एक हजार बेडचं कोविड सेंटर उभारलं होत. त्याची दखल खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली होती. लंके यांना भेट म्हणून कार्डियाक ॲम्बुलन्स भेट दिली होती. सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, मात्र लंके यांच्या सारखी प्रत्येकाने जर जबाबदारी घेतली तर या संकटातून बाहेर पडण्यास हार फार वेळ लागणार नाही, अशी भावना मतदारसंघातील नागरीक व्यक करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ‘सरकारच्या संकटमोचन’ संजय राऊतांनी धावून यावे !, शेलारांची टीका

News Desk

उद्धव ठाकरेचं ५ वर्ष मुख्यमंत्री असतील! नाना पटोलेंचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk

फडणवीस म्हणतात, “मुख्यमंत्री महोदय तुमच्या मंत्र्यांना आवरा”

News Desk