HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्य उद्या ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचण्यासाठी जाणारच!

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्या सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जावून हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली. राज्यातील संकट दूर होण्यासाठी आम्ही मातोश्री येथे हनुमान चालिसाचे पठण करणार होतो. शिवसेना हनुमान चालिसाला विरोध का?, असा सवाल रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीका केली आहे.   राणा दाम्पत्यांनी आज (२२ एप्रिल) पत्रकार परिषदेतून मातोश्रीवर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

रवी राणा म्हणाले, “उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात संकट आले आहे. राज्यातील संकट दूर करण्यासाठी आम्ही मातोश्री येथे हनुमान चालिसाचे पठण करणार होतो. शिवसेना हनुमान चालिसाला ऐवढा विरोध का?, असा सवाल रावी राणा यांनी उपस्थित केला आहे. रावी राणा पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंना दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. आम्ही पोलिसांना सहकार्य करणार असून कायदा सुव्यवस्थेचे पालन करणार आहोत. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा नव्हे तर आम्हाला १०० वेळा हनुमान चालिसा वाटवण्यास परवानगी दिली असती. आमच्या कार्यकते मुंबईला हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येणार आहेत त्यांनी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्याचा नाही, असे आवाहन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. 

बाळासाहेबांची शिवसेना असती तर आम्हाला हनुमान चालिसा वाचू दिली असती. बाळासाहेबांनी शेतकरी आणि बेरोजगारांच्या हितासाठी हनुमान चालिसा वाचू दिली असती. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते आम्हाला विरोध करत आहेत. हे सर्व हिंदू पहात आहेत. आम्ही मुंबईला आलो हे माहीत नाही. आम्हाला आमरावतीत थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही मुंबईत पाय ठेवून दाखवा. मी तर पाय नाही, मी मुंबईत जिंवत उभा आहे.  आम्हाला १०० धमक्या दिल्या तरी हनुमान चालिसा वाचणारच आहे, असेही रावी राणा म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी “ती” चूक पाहून चक्क मारला कपाळाला हात!

News Desk

‘रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांविरोधात एफआयआर दाखल करणार’ – हसन मुश्रीफ

News Desk

भारत सरकार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करणार, शरद पवार यांनी या निर्णयाचे केले स्वागत…

News Desk