HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा नाही; 29 तारखेपर्यंत कारागृहातच रहावे लागणार

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी नवनीत राणा यांना २९ एप्रिलपर्यंत कारागृहात रहावे लागणार आहे. यामुळे आता राणा दाम्पत्याना मुंबई सत्र न्यायालयाकडून मिळाला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जवर आता २९ एप्रिलला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत राणा दाम्पत्याना कारागृहाच राहावे लागणा आहे. आपले म्हणे मांडण्यासाठी सरकारी वकिलांनी तीन दिवसांचा अवधी मागितला होता. सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या मागणीनुसार मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना तीन दिवसाचा अवधी दिला आहे. 

 

राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसावरून झालेल्या नाट्यानंतर पोलिसांनी काल (२३ एप्रिल) अटक केले होते. राणा दाम्पत्याना वांद्रे न्यायालयाने काल (२४ एप्रिल) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार असून जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा कारागृहात तर रवी राणांचा आर्थर रोड कारागृहात मुक्काम असणार आहे. तातडीने जामीनावर सुनावणी घेण्यास वांद्रे न्यायालयाने नकार दिला आहे. आणि सरकारी पक्ष २७ एप्रिलला आमचे लेखी म्हणणे मांडण्याचा सांगितले आहे.

Related posts

जुगाराच्या वादातून दोघांवर हल्ला

News Desk

मी मुख्यमंत्री बनण्यास बिलकुल तयार नाही !

News Desk

“अजितदादा, जयंत पाटील, मुनगंटीवार, विखे-पाटील आणि मला चित्रपटात भूमिका द्या”- गिरीश महाजन

News Desk