HW News Marathi
Covid-19

आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण!

कोल्हापूर | कोल्हापूरमधील कॉंग्रेसचे युवक आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे विधानसभा आमदार आहेत. ऋतुराज पाटील यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. ऋतुराज पाटील यांनी ट्विट करत याची माहिती दिली होती.

“माझी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरु आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.” असे ट्वीट ऋतुराज पाटील यांनी केले आहे.

 

कोल्हापुरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही ‘कोविड योद्धा’ म्हणून जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. “हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय!” असा व्हिडीओ शेअर करत ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला आवाहन केले होते. “त्याला काय हुतंय?” हा शब्दप्रयोग वापरत ऋतुराज यांनी कानपिचक्या देखील दिल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आजपासून ‘मिशन बिगिन अगेन’चा पहिला-दुसरा टप्पा सुरु, तर काय सुरू-काय बंद असणार ?

News Desk

राज्यात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट

News Desk

देशातील सर्व स्मारकं आणि संग्रहालय १६ जूनपासून खुली होणार!

News Desk