HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“मी समाधान आवताडे शपथ घेतो की..”,पंढरपूरच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ

मुंबई | संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत समाधान अवताडे यांनी भालकेंचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव केला. या विजयानंतर समाधान अवताडे यांनी हा विजय जनतेला समर्पित केल्याचे म्हटले. विजयानंतर आवताडे यांनी आज मुंबईत जाऊन आपल्या आमदारकीची शपथ घेतली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांचा मुंबईत पार पडलेला शपथविधी कार्यक्रम पार पडला. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आवताडेंना गोपनियतेची शपथ दिली. यावेळी, भाजप आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासह भाजपा नेते उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे सध्या मोठ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच, यापूर्वीचं अधिवेशनही ठराविक काळापूरतंच घेण्यात आलं होतं. त्यामुळे, समाधान आवताडे यांचा शपथविधी सोहळाही मोजक्यात लोकांमध्ये घेण्यात आला होता.

काय म्हणाले समाधान आवताडे?

“मी समाधान आवताडे शपथ घेतो की… “,असे म्हणत आवताडे यांनी पहिल्यांदाच आमदारकीची शपथ घेतली. तत्पूर्वी, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत विजयी घोषित करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समाधान अवताडे लोकांची तादक आमच्या पाठीशी होती. हा विजय जनतेचा आहे, असे त्यांनी म्हटले होते. तसेच, निवडणुकीदरम्यान, महाविकास आघाडीकडून जनतेवर दबाव होता. महाविकास आघाडीने अनेक गोष्टींचा वापर केल्याने माझे मताधिक्य कमी झालं आहे, असेही अवताडे यांनी सांगितले.

दरम्यान, पंढरपूरच्या तुलनेत मंगळवेढ्यामधून कमी मताधिक्य मिळालं का, असं विचारलं असता दोन्ही तालुक्यांमधून आपल्याला मताधिक्य मिळाल्याचे सांगितले. तसेच या विजयामागे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या इतर अनेक नेत्यांचे योगदान आहे. त्यांनी साथ दिल्याने हा विजय झाला, असे अवताडे यांनी सांगितले.

Related posts

Pravin Darekar HW Exclusive : उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत !

News Desk

पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास सुरुवात

News Desk

बाबरी पाडली त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना सामनातून उजाळा

News Desk