HW News Marathi
महाराष्ट्र

मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली काढू आमदार संजय राठोड याचं आश्वासन!

यवतमाळ। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याची काल (11 नोव्हेंबर) रात्री हत्या झाली. मूळचा ठाणे जिल्ह्यातील असलेल्या आणि एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल या विद्यार्थ्याची यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या करण्यात आली. घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी संतप्त झाले आहेत आणि आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्याच्या हत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आणि आता एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. माजी वनमंत्री आणि आमदार संजय राठोड यांनी आंदोलनाला भेट देऊन संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्या निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले. अशोक पाल याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून मदत दिली जाईल. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल, असेही सांगितले.मृत डॉ. अशोक पाल मूळचा ठाणे जिल्ह्यातील असून तो एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला होता. काल सायंकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास तो लायब्ररी मधून आपल्या रूमकडे जात असताना त्याच्यावरती चाकू हल्ला करण्यात आला.

त्याच्या छातीवर दोनदा वार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच इतर शिकाऊ डॉक्टर विद्यार्थ्यांनी त्याला रुग्णालयात नेले. त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र साडे अकरा वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. चार महिन्यापूर्वी शहरातील काही तरुणांसोबत त्याचा वाद झाला होता. त्यावेळीही शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली होती. अशी चर्चा परिसरात होती. त्यामुळेच त्याच्यावरती चाकू हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेची नोंद शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा, मराठी माणसाला डिवचू नका!

News Desk

राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा, तर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावे !

News Desk

थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, आज कोणता बॉम्ब फुटणार?

News Desk