HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीची NIA चौकशी करा, मनसेची मागणी!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल (६ सप्टेंबर) त्यांचे मातोश्री निवासस्थान उडवून टाकण्याची धमकी आली होती. या धमकीच्या फोनचा NIA कडून तपास करावा, अशी मागणी मसेनेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली आहे. दुबईहून कॉल करुन ही धमकी देण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आला आहे.

“आतंरराष्ट्रीय कॉल असल्याने हे प्रकरण गंभीर आहे. आमचा मुंबई पोलिसांच्या सुरक्षेवर विश्वास आहे, ते त्यांच्या सुरक्षेची कामगिरी चोख बजावतील. पण आंतरराष्ट्रीय कॉल असल्याने तो कुठल्या दहशतवादी टोळीशी संबंधित आहे का याचाही तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे NIA तपासाची मागणी करत आहोत,” असे संदीप देशपांडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सुदामवाडी गाव प्रथम 

News Desk

राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक

Gauri Tilekar

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Aprna