HW News Marathi
Covid-19

तुमच्याकडून होणार नसेल तर… ! राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (७ ऑक्टोबरमध्ये) पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. आपल्या पत्रात सरकारचे लक्ष वेधताना राज ठाकरे म्हणतात की, “महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय करणं आणि त्यांचा विस्तार करणं नित्याची बाब आहे. कधीही या महिलांनी कर्जाचा हफ्ता चुकवण्यात दिरंगाई केली नाही. परंतु लॉकडाऊनमुळे या ग्रामीण भागातील महिलांचे व्यवसाय जवळपास ठप्प झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे.” याच पार्श्वभूमीवर, ग्रामीण महाराष्ट्रात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या दंडेलशाही संदर्भात राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

राज ठाकरे पुढे आपल्या पत्रात म्हणतात की, “मार्च २०२० पासून कोरोनामुळे केलेलं लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेला आर्थिक आरिष्ट ह्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे व्यवसाय हे जवळपास ठप्प आहेत. मात्र, या कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता मायक्रो फायनान्स कंपन्या कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे, चारचौघात अपमान करणे असले प्रकार सर्रास करत आहेत. या विषयाच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीवर सरकारने अंकुश ठेवायला हवा, कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार ह्या कंपन्यांना कोणी दिला?”, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

पुढे राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला ‘मनसे’च्या खळखट्याकचा इशाराही दिला आहे, “हा विषय गंभीर आहे आणि हे जर असचं सुरु राहिलं तर लक्षात ठेवा ह्यांचे मानसिक आणि सामाजिक परिणाम गंभीर असतील, म्हणून सरकारने आता जागे व्हावे आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फत ह्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवा आणि हे जर सरकार म्हणून तुमच्याकडून होणार नसेल तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण, मुंबईत मात्र 30 वर्षांवरील नागरिकांचं होणार लसीकरण

News Desk

महाराष्ट्र दिनी ‘शिवभोजन थाळी’ने ओलांडला ४ कोटींचा टप्पा !

News Desk

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे कोरोना पॉझिटिव्ह

News Desk