HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

मनसेचा झेंडा हटवला गेला….मनसैनिक कोणता झेंडा घेणार हाती ?

मुंबई | राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच झेंडा बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या २३ तारखेला मनसेचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये होते आहे.आता त्या पार्श्वभुमिवर  मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. मात्र आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडाबदलाच्या चर्चेने आणखीनच वेग पकडला आहे.

मनसेला आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि पक्ष संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी पक्षाचं महाअधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात राज ठाकरे अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.या अधिवेशनात मनसेमध्ये अनेक नविन चेहरे येण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेंडा बदलत मनसे कात टाकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related posts

सामनाच्या प्रकाशनावर तीन दिवस बंदी घाला : श्वेता शालिनीe

News Desk

राज्यातील हे ‘स्थगिती सरकार’ फार काळ टिकणार नाही !

News Desk

मापात पाप करणारे सात पंप जप्त

News Desk