HW News Marathi
महाराष्ट्र

आजपासून तीन दिवस राज ठाकरेंचा पुण्यात मुक्काम, ठाकरे घेणार शाखाध्यक्षांच्या बैठका

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून (२८ जुलै) पुन्हा एकदा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी काळातील निवडणूका लक्षात घेता राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ४२ प्रभागात शाखाध्यक्षांच्या बैठका घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे प्रत्येक शाखाध्यक्षाशी थेट बोलणार आहेत. विशेष म्हणजे आजपासून सुरु होणारा पुणे दौरा राज ठाकरे यांचा १५ दिवसांच्या आत हा दुसरा तीन दिवसाचा दौरा आहे. पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी सर्व मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रभाग प्रमुख आदींशी चर्चा केली. या दौऱ्यात राज ठाकरे हे स्वतः पक्षाचे पदाधिकारी निवडण्यासाठी मुलाखती घेणार आहेत. या मुलाखती नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात होणार असून थोड्याच वेळात राज ठाकरे कार्यालयात दाखल होणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करताना दिसत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेही आता तयारीला लागले आहेत. त्यांनी नाशिक, पुणे या दोन शहरांचा पंधरा दिवसांपूर्वीच दौरा केला होता. आता पुन्हा राज ठाकरे आजपासून पुणे शहराच्या तीन दिवसाच्या दौर्‍यावर आले आहेत. या दरम्यान शहरातील मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक शाखा अध्यक्षांच्या स्वतः मुलाखती घेऊन त्यांची निवड करणार आहेत.

महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे कंबर कसून तयार!

महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसलेली आहे हे दिसून येतंय. मनसे नेते अमित राज ठाकरे आज(२८ जुलै) नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.

बॅग भरून येण्याचं आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल(२७ जुलै) ठाण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. नाशिक आणि पुणे पाठोपात मनसे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे.या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मुख्य अजेंडा ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत मोठे फेरबदल होण्याचे संकेतही दिले जात आहेत. दरम्यान, ठाण्यात मनसेचा सध्या एकही नगरसेवक नाही. अशावेळी ठाणे महापालिकेसाठी होणारी मनसेची ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

राज ठाकरे आता पुणे दौऱ्यावर

राज्यात आता निवडूकीचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे सगळेच पक्ष आपल्या पक्षाला उभारी आणि बळकट करण्याचं काम करत आहेत. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सध्या राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. मात्र, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९ ते २१ जुलै असे तीन दिवस पुणे दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात आजीमाजी पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमा अंतर्गत राज ठाकरे हे संवाद साधणार आहेत. अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बाबू वागसकर म्हणाले की, पुणे शहराच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर राज ठाकरे येत असून राज संवाद उपक्रमा अंतर्गत, सोमवारी १९ जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघाची सेनापती बापट रोडवरील, इंद्रप्रस्थ कार्यालय येथे बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ वेळेत कोथरूड आणि खडकवासला माणिक बाग पेट्रोल पंपा समोरील, परिणय मंगल कार्यालयात होणार आहे. तर दुसर्‍या दिवशी मंगळवारी २० जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत हडपसर आणि कॅन्टोन्मेंट विभागाची कोंढवा खुर्द येथील लोणकर लान्स येथे बैठक होणार असून, १ ते ४ दरम्यान कसबा आणि पर्वती विभागाची बिबवेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटलांची ‘ती’ इच्छा पूर्ण होणं कठीण, शरद पवारांचं कुटुंब खूप मोठं !, मुनगंटीवारांचा टोला

News Desk

नितीशकुमार यांच्या पक्षाचं महत्व कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला – पृथ्वीराज चव्हाण 

News Desk

मुंबईसह राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर

swarit