HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील मनसेच्या शिलेदारांना राज ठाकरे कानमंत्र देणार

पुणे | आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शहराच्या कारभारात विशेष लक्ष घालायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्याकडून पुण्याच्या शहराध्यक्षपदी नेते वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापाठोपाठ पुण्यातील मनसेची कार्यकारिणीही बदलण्यात आली होती. या नव्या कार्यकारिणीतील शिलेदारांना आता राज ठाकरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

उद्या (१२ मार्च) राज ठाकरे या नव्या शिलेदारांशी संवाद साधणार आहेत. या सर्वांना राज यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने यावेळी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा आता राज ठाकरे आपल्या नव्या मावळ्यांना काय आदेश देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेले वसंत मोरे हे आक्रमक नेतृत्त्वासाठी ओळखले जातात. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे केली होती. याच कामगिरीमुळे वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर! पंढरपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Aprna

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी

Aprna

मी इथे कोणतेही स्पष्टीकरण द्यायला आलो नाही ! – राज ठाकरे

News Desk