HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

अमित ठाकरेंनी अजित पवार यांच्यासह राजेश टोपेंना ‘या’संदर्भात लिहिले पत्र

मुंबई | मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे.  यात पत्रात अमित ठाकरे यांनी ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी केली आहे. तसचे अमित ठाकरे आज (२२ जून) दुपारी दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेणार आहेत.

“परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त रु. १६०० मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशां’ना दर महिन्याला रु. ४,००० ते १०,००० इतका मोबदला मिळत आहे,” या गोष्टीकडे अमित ठाकरेंनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले, अशी माहिती अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली.

 

Related posts

कोरोनावर सापडले औषध ! सौम्य लक्षणांवर ‘फेविपीरावीर’ औषधाला भारतात परवानगी

News Desk

अमित शाहांच्या ‘देखते है’चा अर्थ मुख्यमंत्र्यांनी ‘हो’ घेतला –  चंद्रकांत पाटील

News Desk

Budget 2020 | कराच्या रचनेत बदल होण्याची शक्यता

rasika shinde