HW News Marathi
Covid-19

मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईतही कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या’, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

लॉकडाऊन शेवटचा पर्याय!

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लागू करणं हा शेवटचा पर्याय असेल, असं स्पष्ट केलं आहे. “लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल. पण जर आपल्याला करोनासोबत जगायचं असेल, तर मास्क घालणे, हात धुणे आणि अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करावाच लागेल. अनावश्यक गर्दी टाळावीच लागेल. दुर्दैवाने त्यात फरक पडला नाही, तर लॉकडाऊन हा एकमेव मार्ग असेल. आत्ता करोनाची लाट आल्यात जमा आहे. रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढते आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार, आरोग्यमंत्री आणि पालक मंत्र्यांसह सोलापूर दौऱ्यावर, परिस्थितीची करणार पाहणी

News Desk

मुख्यमंत्री आज मुंबईतील कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा, महापालिका आयुक्तांची बोलावली बैठक

News Desk

अजित पवारांनी ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्यात पळवला, विदर्भावर अन्याय केला !

News Desk