HW News Marathi
महाराष्ट्र

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मनसेकडून हनुमान चालीसा आणि महाआरतीचे आयोजन, बाळा नांदगावकरांची माहिती

मुंबई | अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मनसेकडून हनुमान चालिसा आणि महाआरतीचे आयोजन केल्याची माहिती मनसे नेता बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१९ एप्रिल) शिवतीर्थ या त्यांच्या निवसस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्याची बैठक बोवलवली होती. या बैठकीत अयोध्या दौरा, औरंगाबादच्या सभा महाआरती आणि भोंग्यांच्या निर्णयावर चर्चा झाल्याची माहिती देखी नांदगावकरांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. 

बाळा नांदगावकर म्हणाले, ” ३ मे रोजी म्हणजे अक्षतृतीच्या मुहूर्ता राज्यभरात महाआरतीचे आयोजन करण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. यानुसार, मनसैनिक कामाला देखील लागले असून ३ तारखेला परवानगी घेऊन हनुमान चालीसा आणि महाआरती घेणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि गृहमंत्री दिलीप वळेस पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. गृहमंत्री काही गाईडलाईन जारी करणार असून जोपर्यंत गाईडलाईन येणार नाही. तोपर्यंत त्यावर भाष्य करणार नाही. प्रत्येकांनी कायद्याचे पालन करून काम करणार आहेत,” असे ते म्हणाले.

भोंग्यांवर राज्यात तणाव निर्माण केला जात आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेवर केली, असा प्रश्न पत्रकारांनी बाळा नांदगावकर यांना विचारल्यावर ते म्हणाले, “संजय राऊत हे खूप मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलणार नाही, असे बोलून पत्रकारांचा प्रश्न टाळला. राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले असून झेड प्लस सुरक्षेची मागणी केल्याची माहिती नांदगावकरांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला – संजय राऊत

News Desk

बीड जिह्यात अंबाजोगाई नगरपालिकाचे प्रभारी नगर अध्यक्ष राजकिशोर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk

दक्षिण मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार! – डॉ.नितीन राऊत

Aprna