HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचा भ्रष्टाचाराचा आरोप, राज ठाकरेंना लिहिले पत्र!

मुंबई। मनसेचे नवी मुंबईतील गजानन काळे यांच्या पत्नीने आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. माझ्या पतीने नवी मुंबई महापालिकेच्या वाहन विभागात भ्रष्टाचार केला आहे. येथील एका जागेच्या भरतीसाठी अडीच लाख रुपये घेतले होते. या भ्रष्टाचारामध्ये पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली आहे, असा खळबळजनक आरोप गजानन काळेंच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आज केला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गजानन काळेंवर गंभीर आरोप केले. तसेच पोलिस माझ्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी माझ्यावरच दबाव आणत आहेत. गेले तीन दिवस गजानन काळेंवर कोणतीही कारवाई झालेली नाही. अनेक पत्रकारही मेसेज पाठवून माझ्यावर दबाव आणत आहेत, असेही आरोप संजीवनी काळे यांनी केले आहेत.

पोलिसांकडूनही मला सेटलमेंटसाठी बोलावण्यात आले

संजीवनी यांनी तीन दिवसांपूर्वी गजानन काळे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाची तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीमुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. गजानन काळे यांनी अलिकडे नवी मुंबईच्या राजकारणात स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. याचदरम्यान पत्नीने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर लढाई सुरू केली आहे. मनेसकडून मला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. मला फक्त न्याय हवा आहे. मला आता खरी भिती वाटत आहे. पोलिसांकडून, पत्रकारांकडून दबाव येत आहे. एका पत्रकाराने कॉल करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडूनही मला सेटलमेंटसाठी बोलावण्यात आले होते, असे आरोप संजीवनी काळेंनी पत्रकार परिषदेत केले.

भ्रष्टाचारात सामील आहेत

गजानन काळे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या वाहन विभागात भ्रष्टाचार केला आहे. एक जागा भरण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले जात होते. पालिकेतील अनेक अधिकारी त्यांच्यासोबत या भ्रष्टाचारात सामील आहेत. पालिकेचे वॉर्ड ऑफिसर आणि इंजिनिअर यांचे अनेक कॉल्स यायचे. 2008 मध्ये आम्ही संसार चालवताना हिशोब लावायचो. आताच्या घडीला पती गजानन काळे यांनी बेहिशेबी मालमत्ता कमावली आहे, असे संजीवनी काळे यांनी म्हटले आहे.

गजानन काळे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी मिळून भ्रष्टाचार केला आहे. मनसे पक्षातील पदाच्या जोरावर त्यांनी हे सगळे केले आहे. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मी आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. फक्त ते पत्र अजून त्यांना पाठवलेले नाही. मनसेचे संदीप देशपांडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. पती गजानन यांच्याबरोबर याबाबत भांडणे व्हायची, त्यावेळी प्रत्येक भांडणात मैत्रीकुल संस्थेचे अध्यक्ष किशोर जगताप मध्यस्थी करायचे. राजकारणी चेहरा हा वेगळा असतो. गजानन काळेंच्या सर्व कारभाराला त्या दोन महिला पत्रकारसुद्धा तितक्याच जबाबदार आहेत, असेही संजीवनी काळे यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षाच्या अध्यक्षांनी जर परवानगी दिली, तर नावानिशी पुरावे जनतेसमोर मांडेन!

News Desk

आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे त्यामूळे  स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या – अजित पवार

News Desk

“चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसवलं आणि फडणवीसांचं राज्य आलं”

News Desk