डोंबिवली | मुंबईसह उपनगरात नागरिकांना रस्त्यावरील खड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच,कल्याण शीळ रोडवरील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे तीन तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. या ठिकाणी आतापर्यंत खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्याप्रमाणेच डोंबिवलीतही सहज फेरफटका मारावा, किमान त्यामुळे तरी कल्याण-शीळ मार्गावरचे खड्डे भरले जातील, असे उपरोधिक आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
“उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो,” असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे.
@OfficeofUT जी ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील,पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो .@mieknathshinde @CMOMaharashtra pic.twitter.com/FrjkFsHfTy
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 24, 2020
दरम्यान, काल (२४ ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेत आढावा बैठकीसाठी हजेरी लावली होती. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील काही रस्ते चकाचक करण्यात आले. मुख्यमंत्री ज्या ज्या रस्त्यावरुन जाणार आहेत, त्या सर्व रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यात आले. विशेष म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उभे राहून रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून घेतले. मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरुन प्रवास करणार आहेत केवळ त्याच रस्त्यावरील खड्डे बुजवले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र इतर रस्त्यांकडे कोणीही अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे इतर रस्त्यांचे काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित केले जात आहे.
ठाणेकर नागरिकांचा प्रवास सुखकर व खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टीने खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून नितीन कंपनी फ्लायओव्हर येथे सुरू असलेल्या कामांची व्यक्तीशः हजर राहून पाहणी केली. pic.twitter.com/7YKIkWt0Ge
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 23, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.