मुंबई | मशिदींवरील भोंगे उतरवण्याविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आंदोलन करण्यास सुरु करणार होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांना ताब्यात घेतले. यानंतर मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्कजवळच आज (४ मे) सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पोलिसांनी हूलकावणी देऊन पळून गेले. यावेळी महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की झाली आणि यात महिला कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली होती. या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्याता वर्तवली जात आहे.
यानंतर संदीप देशपांडे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. संदीप देशापंडे म्हणाले, “महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली नाही. खोटे गुन्हे दाखल करणार तर ते सहन करणार नाही. महिला पोलिसांना स्पर्श देखील झाला नाही. कुठेही पळून गेलो नाही तर मी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आलो, पळून जाण्याची गरज नाही. कधीही घाबरलो नाही,” असे म्हणाले.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी १5 हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर पोलिसांनी १३ हजार मनसैनिकांवर नोटीस पाठवण्यात आली असून पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांची धरपकड केली आहे. राज्यात कोणत्याही कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाच्या ८७ कंपन्या आणि ३० हजार होमगार्ड पोलीस तैनात करण्यात आले असून पोलिसांच्या सुट्ट्या देखील रद्द केल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
भोंगे उतरविणार जाणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणारच
मशिदीवरील भोंगे हे उतरवले पाहिजे. आणि जोपर्यंत हे भोंगे उतरविले जाणार नाही. तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणारच, अशा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसेचे आजआंदोलन करणार होते. या आंदोलनात मशिदीसमोर हनुमान चालिसा लाण्यात येणार होते. राज्यातील काही ठिकाणी मनसैनिकांनी हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला. परंतु,मनसैनिकांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषदे घेत हनुमान चालिसा विषय हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे, असे ते म्हणाले. पोलिसांनी फक्त मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस नोटीस पाठवित आहेत. पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत. ही गोष्टी आमच्या बाबतीतच का होतेय?, असा सवाल त्यांनी केला आहे. राज ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेत मशिदीच्या मुद्यांवर सरकारवर टीका केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.