HW News Marathi
महाराष्ट्र

जेव्हा राज ठाकरेंचे सरकार येईल तेव्हा…संदीप देशपांडेंचा इशारा

ठाणे | “आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन लोकहितासाठी केले होते. कायद्याची प्रोसिजर ते आता पार पाडत आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं, ज्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब व्याजासकट चुकता होईल. आता जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय. त्याची नोंद करुन ठेवतोय” असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

ट्रेन सुरु व्हावी यासाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केल्यामूळे कर्जत पोलिसांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह चौघांवर कलम १०७ अंतर्गत कारवाई केली आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात आज (२९ सप्टेंबर) सुनावणी झाली. या सुनावणीसाठी संदीप देशपांडे यांच्यासह मनसे नेते गजानन काळे, अतुल भगत, संतोष धुरी आज कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात हजर झाले होते. यावेळी संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“सरकारने कानात कापसाचे बोळे घातले आहेत का माहिती नाही. पण हाय कोर्टाने कान टोचले आहेत. त्यामुळे सरकारने आतातरी सुधारलं पाहिजे. लोकांची उपासमारी होत आहे. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. आज तीच गोष्ट हाय कोर्टाने म्हटली आहे. सरकार घरी बसून जबाबादरी सांभाळत आहे. सरकारने सर्वसामान्यांची जबाबदारी घेऊन रेल्वे चालू केली पाहिजे”, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मविआ सरकार आल्यापासून महाराष्ट्राला पणवती, दहीहंडीवरुन मनसेचे अविनाश जाधव आक्रमक!

News Desk

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची ठाण्यात अनोख्या गाण्यावर एन्ट्री!

News Desk

महाराष्ट्र सदन प्रकरण-आधी गुन्हा नोंदविण्यासाठी संमती, मग सादर झाला मूल्यांकन अहवाल 

News Desk