HW News Marathi
महाराष्ट्र

तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच!

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी काल (२ एप्रिल) संवाद साधला. राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी अनेकांचा खरपूस समाचार घेतला आहे. अर्थमंत्र्यांपासून ते उद्योजक आनंद महिंद्रांनाही त्यांनी लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे मास्क न वापरण्यात कसलं शौर्य? असं म्हणत त्यांनी नाव न घेता मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला होता. आता मुख्यमंत्र्यांच्या या लाईव्हनंतर मनसेही लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हची एकप्रकारे खिल्लीच उडवली आहे. ”मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच ! आज (३ एप्रिल) सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्ह.”, असे ट्विट देशपांडे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत, त्यांनी ११ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं सूचवलं आहे.

मास्क न वापरणाऱ्यांना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावरुन, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता टोला लगावला. अनेकजणांना असं वाटतंय, ये मास्क का लावतोय तू. पण, मास्क न लावण्यात शौर्य काय, मी मास्क वापरणार नाही, मग काय शूर आहेस का? असा प्रश्न विचारत खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. मास्क न लावणे यात शूरता नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दोन दिवसांत कठोर नियमावली जाहीर करणार

मुख्यमंत्र्यांनी यावेळी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करत नसलो तरी इशारा देत आहे, असं सांगत येत्या दोन दिवसांत राज्यात नव्या निर्बंधांची नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. तसेच अशीच रुग्णवाढ सुरू राहिली तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यातील उपलब्ध आरोग्य संसाधनं कमी पडू लागतील आणि कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा थेट निर्वाणीचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भावना गवळींचे दोन्ही सहकारी ईडीसमोर गैरहजर!

News Desk

राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

कांजूर मेट्रो कारशेड प्रकरण : आदर्श वॉटर पार्कचा मालकी हक्क न्यायालयाने फेटाळला

Aprna