मुंबई | राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल काल (१८ जानेवारी) जाहीर झाले. आजही (१९ जानेवारी) मतमोजणी सुरु आहेच. सध्याच्या निकालानंतर भाजप नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीनेच बाजी मारल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या या संपूर्ण निकालात मनसेनेही स्वत:कडे लक्ष वेधून घेतलं आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांच्या तुलनेत मनसेने कमी जागा पटकावल्या असल्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे, बीड, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर, याठिकाणी मनसेने आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. अंबरनाथ येथील काकोळे ग्रामपंचायत मनसेने बाजी मारली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ९ सदस्य निवडून आले आहेत. ग्रामपंचायतीच्या या यशानंतर मनसेकडूनही आता प्रतिक्रिया आली आहे.
मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी निवडून आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केले आहे. अनिल शिदोरे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय जमिनीवर आहेत असं वाटतं. परिस्थितीबरोबर आपली नाळ जुळल्याचं जाणवतं. काहीतरी आपल्या आवाक्यातलं, आपल्या जगण्यातलं असल्यागत वाटतं. लोकशाहीचं खरं रूप भेटल्याचा आनंद होतो, अशी भावना अनिल शिदोरे यांनी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय जमिनीवर आहेत असं वाटतं.. परिस्थितीबरोबर आपली नाळ जुळल्याचं जाणवतं. काहीतरी आपल्या आवाक्यातलं, आपल्या जगण्यातलं असल्यागत वाटतं.. निवडून आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन !
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) January 18, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.