मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (९ मार्च) १५ वा वर्धापन दिन आहे. या वर्धापदिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून वर्धापन दिनाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा,” असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.
तसेच राज ठाकरेंनी या ट्वीट केलेल्या फोटोत किल्ल्याचा बुरुज पाहायला मिळत आहे. त्याला फुलांच्या रंगेबेरंगी माळांनी सजवण्यात आले आहे. तसेच नुकताच होणारा सूर्यादय आणि आकाशात उंच भरारी घेणारा एक पक्षी दिसत आहे. या फोटोवर १५ वा वर्धापन दिन, तमाम महाराष्ट्र सैनिकांना मन:पूर्वक शुभेच्छा असे लिहिण्यात आले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. #मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/MnM9cLbVlQ
— Raj Thackeray (@RajThackeray) March 9, 2021
मनसे’चा वर्धापन दिन सोहळा रद्द
दरवर्षी मनसेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये वर्धापनदिनानिमित जय्यत तयारी करण्यात येते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’चा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्यावर्षी वर्धापन दिन सोहळा हा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाचे शॅडो कॅबिनेट जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, आज (९ मार्च) राज्यभर मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली जाणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.