HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मनसेचा फक्त झेंडा बदलला, भूमिका नाही !

औरंगाबाद | मनसेचा फक्त झेंडा बदलला, भूमिका नाही, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तर भूमिका बदलून अनेक जण सत्तेत आले, असा टोला राज ठाकरेंनी शिवसेनेला लगावला. राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारता सांगितले. राज ठाकरे हे सध्या तीन दिवसीय मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, राज ठाकरे म्हणाले की, औरंगबादाचे नाव बददले तर काय हरकत आहे. चांगले बदल हे झालेच पाहिजे, असे म्हणत त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांनी राज ठाकरेंना पक्षच्या नव्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारला. राज ठाकरे म्हणाले की, मनसेचा फक्त झेंडा बदलला, भूमिका नाही. तर भूमिकेत बदल करून अनेक जण सत्तेत यातात, अशी टीका राज ठाकरेंनी शिवसेनेला लगावला. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रश्नावर त्यांनी उत्तर देता ते म्हटले. “हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्यांनी कधी मोर्चा काढला का?,” असा सवाल उपस्थित करत नाव न घेता शिवसेनेवर राज ठाकरेंनी टीका केली.

मनसेच्या नव्या झेंड्याबद्दल विचाल्यावर ते म्हणाले की, मनसेच्या नव्या झेंड्यासंदर्भात कोणतीही नोटीस आली नसल्याचे राज ठाकरे स्पष्ट केले. मला हिंदू जननायक म्हणून नका, अशी विनंती राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये केली. तसेच घुसखोरांबाबत भूमिका जुनीच असल्याचा दावा राज ठाकरेंनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेला गांभीर्यांने घेण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली. या टीकेला उत्तर देत राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांसोबत वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे ते म्हणाले.

 

Related posts

साताऱ्यात ३.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, परिसरात भीतीचे वातावरण

News Desk

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरवर २ ठिकाणी अपघात

गांधींबद्दल वादग्रस्त ट्वीट प्रकरणी चौधरींची मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली

News Desk